बेळगाव शहरात मुस्लिम बांधवांनी रमजान ईदचा सण मोठ्या भक्तिभावाने साजरा केला.
यावर्षी कोविड रुग्णांची संख्या कमी असल्याने मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात महिनाभर रमजानचा सण काटेकोरपणे पाळत आज ईद मोठया उत्साहात पार पाडली .
यावेळी बोलताना मुफ्ती अब्दुल काझी म्हणाले,की “देशात शांतता आणि आनंदासाठी आम्ही अल्लाहकडे प्रार्थना केली आहे. दोन वर्षात कोरोनाने अनेकांना धडा शिकवला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे सर्वांनी एकात्मतेने व भावाप्रमाणे राहावे. कोणताही धर्म दुसऱ्या धर्मासाठी वाईट नसतो..सर्व धर्मांनी चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत. बरेच नागरिक जे काही बोलतात त्याचे ऐकू नका. विविधतेत एकता असलेल्या आपल्या देशाचा वारसा पुढे नेण्याचा सल्ला त्यांनी सर्वांना दिला.
रमजान आणि ईदच्या निमित्ताने सर्व वयोगटातील लोकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरात आणि परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.