बेळगाव :
प्रती वर्षा प्रमाणे आराध्य दैवत श्री भावेश्वरी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाच्या नियोजना बाबत निर्णय घेण्याबाबत मंगळवार दि.18 जानेवारी 2022 रोजी मंदिराच्या कार्यालयात श्री भावकाई देवी ट्रस्ट मेंबर्स आणि सर्व पाटील भावकी यांची मीटिंग घेण्यात आली व सविस्तर चर्चा करून पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी प्रमाणेच या वर्षीही रूढी परंपरा प्रमाणे यावर्षीचा यात्रा उत्सव साजरा करणेचा ठरले आहे.
यात्रा उत्सव कार्यक्रमाचे नियोजन
- माघी पौर्णिमा मंगळवार दि. 15 फेब्रुवारी 2022 रोजी श्री लक्ष्मीदेवी यात्रा.
- बुधवार दि. 16 फेब्रुवारी 2022 रोजी देव बोलाऊन आणने आणि मंदिरात उत्सव मूर्तींची प्रतिष्ठापना करणे
- गुरुवार दि. 17 फेब्रुवारी 2022 रोजी शस्त्रईंगळ्या.
- शुक्रवार दि. 18 फेब्रुवारी 2022 रोजी भर यात्रा.
- शनिवार दि. 19 फेब्रुवारी 2022 रोजी पालखी सोहळ्या नंतर यात्रा समाप्ती.
अशा पद्धतीने यात्रेचे नियोजन करणेत आले आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासना कडून वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या निर्णया/सुचने नुसार पुढील निर्णय घेण्यात येतील असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला आहे.
तरी प्रतिवर्षा प्रमाणे यंदाही सर्वांनी गावी येऊन, सर्वांच्या सहभागाने आणि सहकार्याने यात्रा उत्सव संपन्न करावा व देवीच्या सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती.
श्री भाऊराव विष्णू पाटील – चेअमन.
श्री संतराम विठोबा पाटील- सेक्रेटरी.
आणि सर्व ट्रस्टी मेबर्स, व समस्त पाटील भावकी मोदगे यांनी केली आहे.