बेळगाव :
आज रात्रीपासून नाईट कर्फ्यू रद्द करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय काही निर्बंध देखील शिथिल करण्यात आले आहेत. कोरोना रुग्णसंख्या घटल्याने तसेच संसर्गाचे प्रमाण ही घटत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
शुक्रवारी झालेल्या कोरोना तांत्रिक सल्लागार समितीच्या बैठकीनंतर राज्य सरकारने नाईट कर्फ्यू मागे घेण्याची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी आज रात्रीपासून सुरू होणार आहे.
पब ,हॉटेल ,रेस्टॉरंट ,बार पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येणार आहेत. तसेच चित्रपटगृह ,रंगमंदीर ,ऑडिटोरियम मध्ये निम्म्या प्रेक्षकांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबरोबरच राजकीय मोर्चा, रॅली, धरणे आंदोलन ,मेळावा आदींना राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. या आधी महिनाभर रात्री दहा ते पहाटे पाच पर्यंत नाईट कर्फ्यू जारी करण्यात आला होता. मात्र आता महिन्याभरानंतर नाईट कर्फ्यू रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे