सुरेश नागाप्पा तोपिनकट्टी वय 25 राहणार गणेबैल आणि गणेश विठ्ठल बामणे वय 22 राहणार नंदगड रायपूर गल्ली या युवकांची
दुचाकी झाडाला धडकून ते दोघे जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.
येथील खानापूर नंदगड मार्गावर हेब्बाळनजीक एका वळणावर दुचाकीस्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सदर अपघात घडला.या अपघातात दोन युवक ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे.
गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव परशुराम महादेव गुरव वय 15 आहे. तसेच जखमीवर इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की नंदगडहुन खानापूर कडे एका दुचाकीवरून तिघेजण येत असताना चालकाचे नियंत्रण सुटून दुचाकी झाडाला आदळली. यावेळी दोघांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे सदर अपघाताची नोंद नंदगड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.