यळेबैल मध्ये श्री दुर्गामाता मंदिराचा चौकट पुजन समारंभ दोन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.शुक्रवार दिनांक 12 मे 2022 रोजी सकाळी 10 वाजता श्री दुर्गा माता मंदिराच्या चौकटीची मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणूक उद्घाटन डॉक्टर राजू धामणेकर यांच्या हस्ते करण्यात आले.मिरवणुकीमध्ये गावातील सर्व महिला कळशी घेऊन सहभागी झाल्या होत्या. त्याचबरोबर गावातील संत मंडळी भजनाच्या गजरात मिरवणुकीमध्ये सहभागी झाली होती.
या कार्यक्रमाची सार्वजनिक दुर्गा माता मंडळ व पंच कमिटी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच गुरुवार दिनांक 13 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री दुर्गा माता मंदिराच्या चौकट पूजनाचा समारंभ आयोजित केला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कलाप्पा मरगळे उपस्थित होते.
मंदिराची चौकट कैलासवासी लक्ष्मी खाचु शहापूरकर यांच्या स्मरणार्थ परशराम खाचू शहापूरकर आणि मारुती पाटील यांनी मंदिराची चौकट दान स्वरूपात दिली.या दोन प्रमुखांच्या हस्ते चौकटीचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन श्री मल्लाप्पा इंदुरकर सिद्धराम पेडणेकर, गणपती पाटील, पंतोजी येळ्ळूरकर,बाळू येळ्ळूरकर रघुनाथ पाटील निंगप्पा शहापूरकर,गणपती केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यळेबैल गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.