बेळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील शिंदोळी क्रॉस सांबरा रोड येथे CSC सेंटर चे उद्घाटन बेळगावच्या खासदार श्रीमती मंगला अंगडी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील जनतेला सहाय्य व्हावे म्हणून या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे.
याप्रसंगी बोलताना खासदार मंगला अंगडी म्हणाल्या की केंद्र सरकारच्या डिजिटल इंडियाच्या कार्यक्रमांतर्गत भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळाच्या कार्यकर्त्यानी हाती घेतलेल्या सेवा कार्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे .अशाच प्रकारे सर्वानी पुढे येऊन जनतेसाठी नेहमी कार्य केले पाहिजे असे सांगितले.
तसेच यावेळी बोलताना भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले, की अनेक दिवसापासून बेळगाव ग्रामीण मध्ये एक चांगले CSC सेंटर व्हावे जेणेकरून जनतेची लूट थांबवावी व सरकारी व गैर सरकारी सगळे कागदपत्र केंद्र सरकार व राज्य सरकारच्या सगळ्या योजना जनतेसाठी उपलब्ध व्हाव्यात यासाठीच हा खटाटोप आपण करत असल्याचे सांगितले .
या ठिकाणी आधार कार्ड अपडेट, रेशन कार्ड (APL- BPL), वोटिंग कार्ड, केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या सगळ्या योजना, लेबर कार्ड, ई-श्रम कार्ड, जन्म दाखला, मरण दाखला, पासपोर्ट आदिंसह 400 पेक्षा जास्त सरकारी व असरकारी कागदपत्र या केंद्रातून उपलब्ध होणार आहेत. तसेच गावोगावी सुद्धा शिबिरे आयोजित करून गावातच कागदपत्र करण्यासाठी आपण कार्यक्रम राबवु असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला माजी आमदार मनोहर कडोलकर, बीजेपीचे युवा नेते राजू देसाई, बेळगाव ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश पुरी, सांबरा महाशक्ती केंद्र प्रमुख भरमा गोमानाचे, हलगा महाशक्ती केंद्र प्रमुख भुजंग सालगेडे, बीजेपीचे ज्येष्ठ नेते वसंत पाटील, बेळगाव जिल्हा कार्यालय चिटणीस वीरभद्र पुजारी, ग्रामीण मंडळ सोशल मीडिया प्रमुख डॉक्टर. राजू पाटील, ग्रामीण मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष लींगराज हिरेमठ, यतेश हेब्बाळकर, प्रशांत सोगली, विकास देसाई, गणपती होसमनी, आदिंसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते