नंदन मक्कळ धाम आणि आश्रय फॉउंडेशनला देऊ केली मदत
हेंरी डोनंट यांच्या 159 व्या जन्मदिन हा जागतिक रेडक्रॉस दिन साजरा करणार येतो. हा त्यांचा जन्मदिन येथील नंदन मक्कळ धाम आणि आश्रय फाऊंडेशनच्या एड्सबाधित मुलांसोबत रेड क्रॉस आणि साजरा केला.
यावेळी भारतीय रेड क्रॉस संस्था बेळगाव जिल्हा शाखेच्यावतीने येथील मुलांना दोन महिने पुरेल इतका धान्य साठा वितरित करण्यात आला. रेड क्रॉस तर्फे देण्यात आलेल्या मदतीबद्दल नंदन मक्कळ धामच्या कस्तुरी व आश्रय फाऊंडेशनच्या नागरत्न यांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी रेड क्रॉस चे डॉक्टर एस बी कुलकर्णी डॉक्टर सुमंत हिरेमठ प्राध्यापक एपी मानगे डी एम वाडगे मुख्याध्यापक सतीश पाटील स्मिता पाटील डॉक्टर डी एन मिसाळे यांच्यासह आणि उपस्थित होते
यावेळी बोलताना डॉक्टर डी एन मिसाळे म्हणाले की मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रेडक्रॉस संस्था नेहमीच प्रयत्नशील आहे. आणि यापुढेही राहील रेडक्रॉस संस्थेतर्फे मुलांसाठी काही हवे असल्यास त्यांनी निसंकोचपणे आमच्याशी संपर्क साधावा आम्ही त्यांना त्वरित मदत देऊ करू अशी ग्वाही दिली.