डॉ समीर आणि डॉ सोनाली सरनोबत यांनी खानापूर येथील श्री विनायक दळवी या वंचित विद्यार्थ्याला वैद्यकीय पुस्तकांसाठी (₹१००००) शिष्यवृत्ती म्हणून मदत दिली आहे .
या विद्यार्थ्याने आर्थिक मदतीसाठी डॉ. समीर आणि डॉ. सोनाली यांच्याशी संपर्क साधला.
त्यामुळे त्यानी त्याची गरज ओळखून त्याला मदत देऊ केली .
सरनोबत दाम्पत्य अशा इच्छुक विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी नेहमीच पुढे येत असतात.
डॉ सोनाली यांनी श्री विनायक यांना चांगले डॉक्टर बनून खानापूरच्या लोकांची सेवा करण्याचा सल्ला दिला. विनायक हा NEET पास झाला आहे तसेच त्याने बेळगावच्या आयुर्वेदिक कॉलेज मध्ये प्रथम वर्ष बीएएमएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे.