रेड क्रॉस मार्फत वैद्यकीय तपासणी
बेळगाव पासून 70 किलोमीटर लांब असलेल्या रामनगर जवळ गवळीवाडा तालुका खानापूर येथील इयत्ता पहिली ते सहावीच्या सर्व 90 विद्यार्थ्यांना जवळपास 35 हजार रुपये किंमतीचे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले .या शैक्षणिक साहित्यामध्ये एक बॅग, एक पाऊच, पेन,पेन्सिल, रबर, शार्पनर,दोन नोट बुक असे साहित्य होते.
या कार्यक्रमात उद्देशुन बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री ईश्वर पाटील म्हणाले की शहराच्या आस पास प्रदर्शन म्हणून काही जण सामाजिक कार्य करतात. मात्र गरिब विद्यार्थ्यांचा शोध घेवून, त्यांची गरज ओळखून, त्यांना पुढील शिक्षणासाठी उपयुक्त होईल असेच साहित्य देण्याचा वेदांत फौंडेशनचा उपक्रम स्तुत्य आहे .
घनदाट अरण्यात वास्त्यव्य, कोणत्याही विशेष सोई सुविधा नसताना सुद्धा शिक्षणाची असलेली ओढ, शिकण्याची तळमळ, काहीतरी करून दाखवायच्या विद्यार्थांच्या गुणांचे त्यांनी कौतुक केले.दुर्गम भागात ज्ञानदान करणाऱ्या खानापूर तालुक्यातील शिक्षकांचेही कौतुक केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टिळकवाडी सरकारी शाळा क्रमांक 9 चे मुख्याध्यापक सतीश पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा डॉ डी एन मिसाळे, रेड क्रॉसचे अशोक बदामी ,उपस्थित होते .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीमहेश फौंडेशन कडून 10000 किमतीच्या बॅग व पाऊच , काजू व्यापारी श्री रविंद्र हरगुडे यांच्या कडून रु 5000, समाज सेवक दिपक किल्लेकर याच्याकडून 4111 बुक लव्हर्सच्या आशा रुतोनजी यांच्याकडून 2000 परिवर्तन फौंडेशन कडून 2000 , वाघू पाटील यांच्याकडून 1111, नामदेव कानशीडे यांच्याकडून , संजय गावकर यांच्या कडून,श्रीमती सी. जे. बीर्जे , जी डी.जाधव , प्रभावती पाटील, विजय देसाई यांनी प्रत्येकी 1000 रुपये दिले.
तर सविता चंदगडकर , माया चौगुले , जी एन पाटील ,के एल लगारे , व्ही बी बेडका , एम टी सावंत , पी जी दळवी , विद्याधर यादव , एस.डी पाटील , पी बी चौगुले यांनी प्रत्येकी 500 रुपये देणगी दिली .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योजना प्रमुख शिक्षक श्री ईश्वर पाटील श्रीमती रेखा चौहान ,श्रीमती , अनुराधा तारीहाळकर ,श्रीमती वनिता सायनेकर या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले .
या कार्यक्रमाचे औचीत्य साधत रेडक्रॉस शाखा बेळगाव या संस्थेमार्फत गवळी समाजातील 200 लोकांची वैद्यकिय तपासणी व मोफत गोळ्या औषधे , मास्कचे वितरण करण्यात आले .के .एल ई संस्थेच्या विशेष डॉक्टर पथकाने हे काम पाहिले
यावेळी श्री. व्ही आर सुतार एस डी पाटील एम के पाटील संजय गावकर यांचे विशेष कौतुक करून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला वेदांत फौंडेशनचे उपाध्यक्ष सुनिल देसूरकर, जीवन संघर्ष फॉउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ गणपत पाटील , डब्लू डी पाटील तसेच श्री यादव , निरंजन सर , विनायक कांग्राळकर सर अस एकुण 45 शिक्षक उपस्थित होते.सुत्रसंचालन श्रीमती. अनुराधा तारीहाळकर, तसेच आभार श्री. संजय गावकर यांनी मानले