आपण जन्माला येऊन आपणही या समाजाचे काही तरी देणे आहे” या विचाराने वन टच फॉउंडेशन कार्य करत आहे.त्यांनी कोरे गल्ली शहापूर येथील सर्व प्रकारचे पेपर आणि दूध घरोघरी वाटून आणि विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे श्री रमेश सरवडे , यांच्या घरी जाऊन समक्ष भेटून त्यांना मदत दिली आहे ,
या कुटुंबाला 15 दिवस ते एक महिना सर्वाना पुरेल इतके जीवनावश्यक आहार धान्य साहित्य दिले आणि त्यांच्या परिस्थितीचा आढावा वन टच फॉउंडेशनने घेतला आहे .
सदर व्यक्तीची पत्नी अर्धांगवायूनी अंथरुणावर खिळून आहे. त्यांची आई वरचेवर आजारी असते, तसेच एक कर्ता तरुण मुलगा आहे त्याला घश्याच्या त्रास आहे याच्या उपचाराचा खर्च महिना सहा हजार येतोय, पत्नीचा खर्च महिना दोन हजार येतोय, घर भाडे दोन हजार आहे. हे सर्व पाहून , ऐकून त्यांना “वन टच फाऊंडेशन जुना गुडसशेड रोड बेळगाव या संस्थेच्या पुढाकारातून दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून दहा हजार देण्याचे जाहीर केले आहे
ज्या दानशूर व्यक्तींना गरजू नागरिकांना मदत करायची असल्यास त्यांनी जीवनावश्यक आहार धान्य साहित्य, किंवा त्यांच्या उपचारासाठी सहकार्य करावे तसेच वन टच फाऊंडेशनशी या नंबरवर 8884640133 संपर्क साधावा असे आवाहन केले आहे