शिवसेना बेळगाव जिल्हा विभागाच्या वतीने उद्या हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यात येणार आहे. कन्नड सक्ती विरोधातील 1986 च्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना उद्या 1 जून रोजी सकाळी नऊ वाजता हुतात्मा स्मारक हिंडलगा येथे अभिवादन करण्यात येणार आहे. त्यामुळे या हुतात्मा दिनी शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू हेरवाडकर शिवसेना तालुकाप्रमुख सचिन गोरले शहर उपप्रमुख राजू तुडयेकर प्रवीण तेजम राजकुमार बोकडे महीपाल ईतापाचे विनायक जाधव प्रकाश राऊत यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.