वेदांत फाउंडेशन बेळगाव च्या वतीने दहावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
दहावीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. मात्र जे विद्यार्थी जास्त गुण घेऊन शाळेत
अव्वल स्थानी आले आहेत अशा विद्यार्थ्यांचा वेदांत फाऊंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रम लक्ष्मी नगर हिंडलगा येथे वेदांत हवेलीत संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. दरवर्षी वेदांत फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा समारंभाचे आयोजन करण्यात येते या वेळी त्यांना शाल श्रीफळ पुष्पहार आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
यावेळी अमोघ कौशिक 100% रवीना बसरी मर्द 99.68% सुरज पाटील 97.92 %, सुरज पाटील 97.92% जिजा शहापूरकर 95.36% आदिती मधुकर 94% निशिता गुंजीकर 93.73% गुण प्राप्त केल्याने या विद्यार्थ्यांना वेदांत फाउंडेशन तर्फे गौरविण्यात आले.
यावेळी दहावीच्या परीक्षेत टॉपर्स आलेल्या विद्यार्थ्यांना डॉक्टर डी एन मिसाळे , प्रशांत बिर्जे श्रीकांत आजगावकर सुजाता लोखंडे रघुनाथ उत्तूरकर यांच्याकडून बक्षिसे जाहीर करण्यात आली. यावेळी सतीश पाटील युवराज रत्नाकर सुजाता लोखंडे ईश्वर पाटील सुनील देसुरकर आस्मान नाईक असिफ आत्तर प्रशांत बिर्जे सविता चंदगडकर सुनंदा मधुकर उत्तम पाटील के टी चव्हाण डॉक्टर डी न मिसाळे यांच्यासह शिक्षक पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.