महापालिकेच्या इमारतीमध्ये निवडणुकीसाठी साहाय्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. कर्नाटक वायव्य शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सदर साहाय्य केंद्र सुरू करण्यात आले आहे.
तसेच हे साहाय्य केंद्र महापालिका हद्दीतील नागरिकांसाठी 24*7 कार्यरत राहणार आहे. तसेच निवडणुकीसंदर्भात कोणतीही माहिती हवी असल्यास किंवा तक्रार असल्यास त्यांनी 083 1295 0226 या हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन महानगरपालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांनी केली आहे.