एका तरुणाने शेतवाडी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जुने होसुर येथे घडली आहे. लगमप्पा यलाप्पा भरनट्टी वय 28 राहणार जुने होसुर असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून त्याने मनस्तापातून आपले जीवन संपविले असल्याची माहिती पुढे आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की लगमप्पाच्या पत्नीचा तीन ते चार वेळा गर्भपात झाला होता त्यामुळे या मनस्तापातून त्याने आपले जीवन संपवले असल्याची माहिती मिळाली आहे. लगमप्पाने नवे होसुर येथील यल्लाप्पा मूकनावर यांच्या शेतात वाडीतील झाडाला आपल्या पॅन्ट व शर्ट च्या गळफास बनवून आत्महत्या केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा केला तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटल मधील शवागृहात पाठविला. या घटनेची नोंद काकती पोलीस स्थानकात करण्यात आली असून पत्नी हल्लावा भरनट्टी यांनी ही फिर्याद दिली आहे.