अनमोड चेक पोस्टवर 900 लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. बेळगाव गोवा महामार्गावर अनमोड चेक खात्याने ही कारवाई केली असून संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जरी पोलिसांनी गोवा बनावटीची दारू जप्त केली असली तरी वाहन मालकाचा शोध घेण्यात पोलिस गुंतले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.या घटनेत आंध्र प्रदेश मधील राजनल ब्रोडी याला अटक करण्यात आली आहे.
तसेच त्यांच्याकडून दारू आणि वाहन दोन्ही मिळून अंदाजे 14 लाख 51 हजार 200 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई अबकारी उपनिरीक्षक श्रीकांत असोदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. अबकारी अधिकाऱ्यांनी हा सापळा रचून ही कारवाई केली आहे.