शहरात उद्या महेश नवमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .येथील शहापूर मधील बालाजी मंदिरात भगवान महादेवाला अभिषेक करून महेश नवमी निमित्त विविध कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे.
यावेळी सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत माहेश्वरी भवन येथे रक्तदान शिबिर पार पडणार आहे तसेच सायंकाळी पाच वाजता माहेश्वरी समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रा काढली जाणार आहे.
या शोभायात्रेला बालाजी मंदिर शहापूर येथून सुरुवात होणार असून सराफ गल्ली खडेबाजार महात्मा फुले रोड शिवाजी उद्यान व पुन्हा खडेबाजार विठ्ठल देव गल्ली येथून बालाजी मंदिरात शोभायात्रेची सांगता होणार आहे
तरी महेश नवमी निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.