शहरातील 64 बसेसमध्ये जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे या यंत्रणेद्वारे प्रवाशांना बस कुठे आहे आणि किती वेळात बसस्थानकावर पोहोचणार आहे याची माहिती मिळणार आहे.
शहर स्मार्ट करण्यात येत आहे त्याबरोबरच बस थांबे हि स्मार्ट करण्यात येत असून त्या ठिकाणी डिजिटल सेवा देण्यात आली आहे.
शहरात स्मार्ट सिटी योजनेतुन 64 बसेसमध्ये जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. या जीपीएस यंत्रणेमुळे बस नेमक्या कुठे आहेत हेही समजणार आहेत. अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक प्रवीण बागेवाडी यांनी दिली आहे.
स्मार्ट सिटी योजनेतून बेळगाव मध्ये ॲप विकसित करण्यात आली असून नागरिकांना गुगल प्ले स्टोअर वरून सदर ॲप डाऊनलोड करता येणार आहे. तसेच या ॲपच्या माध्यमातून बसमध्ये जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे
यामुळे या ॲपचा प्रवाशांनी अधिकाधिक वापर करून घ्यावा तसेच याबाबत इतरांमध्ये ही जनजागृती करावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.