No menu items!
Saturday, August 30, 2025

कर्नाटकातील सात-शहरांमध्ये औद्योगिक टाउनशिप योजना

Must read

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकाने राज्यात नवीन गुंतवणुकीचे स्वागत करण्यासाठी कर्नाटकातील काही शहरांमध्ये औद्योगिक टाउनशिप विकसित करण्याची योजना आखली असल्याची माहिती शनिवारी दिली.

बोम्मई यांनी शनिवारी हरियाब्बे गावात धर्मपुरायेथे इतर विकास कामांच्या पायाभरणीनंतर जनतेला संबोधित करताना, राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या गरजेवर भर देऊन देणार असल्याचे सांगितले .तसेच उत्तर कर्नाटक प्रदेश औद्योगिकीकरण झाला पाहिजे असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी त्यांनी चेन्नई-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर अंतर्गत येणाऱ्या चित्रदुर्ग, दावणगिरी , बेळगाव आणि धारवाड जिल्ह्यांमध्ये औद्योगिक टाऊनशिपची योजना आखली जात असल्याचे सांगितले.

तथापि, उद्योग मंत्री मुरुगेश निरानी यांच्या म्हणण्यानुसार 7 शहरांमध्ये म्हणजे कलबुर्गी, बेळगाव, शिवमोग्गा, मंगळुरु, बेंगळुरू, धारवाड आणि तुमकूर येथे औद्योगिक टाऊनशिपची योजना आखली जात आहे. सरकार या ठिकाणांवरील जागा शोधत आहे. मॉडेल औद्योगिक निवासी टाऊनशिप बनवण्याचे वचन दिले असल्याचे सांगितले .

तसेच प्रस्तावित औद्योगिक टाऊनशिप बहुउपयोगी टाऊनशिप असतील. 85% औद्योगिक कारणासाठी आणि उर्वरित 15% निवासी, व्यावसायिक, शाळा, रुग्णालये यासाठी राखीव ठेवण्यात येईल, असे मंत्री म्हणाले.

याबरोबरच खानापूर औद्योगिक क्षेत्र : हुबळी येथे TiEcon-2022 च्या उद्घाटन कार्यक्रमात उद्योग मंत्री मुरुगेश निरानी यांनी माहिती दिली की, खानापूरजवळ 1000 एकर क्षेत्रफळाचे औद्योगिक क्षेत्र विकसित केले जात आहे जे कारवार बंदरापासून फक्त 80 किमी आणि बेळगाव विमानतळापासून 40 किमी अंतरावर असल्याचे सांगितले.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!