आपल्या दुकानातील कामगारांच्या मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करण्याचा स्तुत्य उपक्रम येथील क्रिजवाईज टेलर्स च्या वतीने राबविण्यात आला . यावेळी सोमवारी दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कामगारांच्या पाच मुलांना रोख रक्कम पुरस्कार व मिठाई देऊन गौरविण्यात आले
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते आणि क्रिजवाईज चे मालक श्री कृष्ण भट यांनी प्रतिक्षा हेगडे, महिला विद्यालय -98% ,कुमारी पायल वासुदेव कर्मवीर विद्या मंदिर -92℅, सायली पोटे ,भरतेश स्कूल- 65%, हरीश आर आय , बेननस्मिथ स्कूल- 60 % व साक्षी जाधव -60 % असे गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी रोख रक्कम देऊ केली .
प्रारंभी श्रीमती वाणी रमेश यांनी स्वागत गीत सादर केले. त्यानंतर कार्यक्रम पार पडला .यावेळी विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी क्रिजवाईज समूहातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.”2004 पासून संपूर्ण टेलर कर्मचाऱ्यांना सरकारच्या सवलती मिळण्यासाठी कृष्णा भट यांनी हा उपक्रम आपल्या दुकानात प्रारंभ करून समाजभिमुख कार्याला चालना दिली असेही अनंत लाड यांनी सांगितले .
तसेच भट कुटुंबियांच्या या उपक्रमाचा अनंत लाड यांनी मुक्तकंठाने गौरव केला. विद्यार्थ्यांना पाठीवर मिळालेली शाब्बासकीची थाप व आर्थिक मदत त्यांच्या प्रगतीसाठी निश्चित उपयोगी ठरेल असा विश्वास श्री लाड यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
याबरोबरच उच्च शिक्षण घेणाऱ्या कामगारांच्या मुलांना आर्थिक सहकार्य करण्याचे जाहीर केले.यावेळी कृष्णा भट ,पंकजा भट, विनायक भट, दीपा भट व अनंत लाड,आणि इतर कामगार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुरस्कार, भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.