वर्ष 2012 पासून नियमितपणे प्रतिवर्षी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गोवा येथे ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित केले जाते; मात्र मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे हे अधिवेशन प्रत्यक्षात होऊ शकले नव्हते; मात्र यंदा 12 ते 18 जून 2022 या कालावधीत फोंडा, गोवा येथे दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनात भारतातील 26 राज्यांतून तथा विदेशातून निमंत्रित हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुख, विविध विषयांतील तज्ञ, ज्येष्ठ अधिवक्ता, लेखक, विचारवंत, उद्योजक, पत्रकार आदी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या अधिवेशनात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने चर्चेचे विविध विषय, हिंदु धर्मीयांच्या समस्या, सहभागी संघटना, मान्यवर व्यक्ती, अधिवेशनाचे स्वरूप आदी माहिती देण्यासाठी एका महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.सदर पत्रकार परिषद बुधवार दिनांक , ८ जून 2022
सकाळी ११ वाजता चन्नम्मा सर्कल, कन्नड साहित्य भवन येथे पार पडणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे .
श्री. सुधीर हेरेकर
हिंदु जनजागृती समिती,
(संपर्क : 98458 37423 )