हिंदवी स्वराज्य संस्थापक,अखंड हिंदुस्थान चे दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकदिनी 6 जून रोजी साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यान शहापूर येथील मूर्तीस कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशन राज्य उपाध्यक्ष व माजी आमदार श्री मनोहर कडोलकर ,मराठा बेळगाव जिल्हा अध्यक्ष कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशन प्रमुख श्री वैभव विलास कदम, नवनिर्वाचित पदाधिकारी सचिन कोले बसू लाड,राहुल भातकांडे, राजू सांबरेकर, गणपत पाटील, वामन कदम यांच्याहस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवभक्तांनी छत्रपती श्री शिवराय यांची आरती व स्मरण करत राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या सन्मानार्थ गगनभेदी घोषणा दिल्या.यावेळी कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते शिवप्रेमी उपस्थित होते.