राम कृष्णाजी हावळ यांचे निधन
श्री नामदेव दैवकी संस्था,बेळगावचे अध्यक्ष,कुशल समाज संघटक,
समाजाचे मार्गदर्शक, आधारस्तंभ, समाज सेवक, आणि अंजनेय नगर येथील रहिवासी राम कृष्णाजी हावळ
यांचे आज सोमवार दिनांक.6 जून रोजी रात्री 8 वा अल्पशा आजाराने निधन झाले.
ते बेळगाव होलसेल भाजी मार्केटचे माजी अध्यक्ष, बेळगाव मर्चंट को-ऑप सोसायटीचे माजी चेअरमन आणि बेळगाव शहरातील अनेक सामाजिक संस्थेत कार्यरत होते.अंत्ययात्रा उद्या मंगळवार दिनांक 7 जून रोजी सकाळी 11वा. अंजनेय नगर,माळ मारूती येथुन निघणार आहे.