No menu items!
Tuesday, December 3, 2024

केंद्रीय अर्थसंकल्पाचा मुख्य फोकस पायाभूत विकासावर

Must read

बेळगाव

डॉ. सोनाली सरनोबत यांची अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया
केंद्रीय अर्थसंकल्पाचा मुख्य फोकस पायाभूत विकासावर आहे. अर्थसंकल्पाची व्याप्ती आणि परस्पर संबंध लक्षात घेता, पायाभूत क्षेत्राची सर्वांगीण वाढ आणि विकास याला अनुसरून अर्थ संकल्प आहे. सर्व नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा प्रदान करण्यात आणि देशात नोकऱ्या निर्माण करण्यास मदत करेल. नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टम मध्ये सर्व आरोग्य नोंदी व्यवस्थापित करण्यासाठी एक मजबूत व्यासपीठ तयार करण्यास मदत करेल, आणि संपूर्ण भारतातील सर्व नागरिकांना रेकॉर्डचा सार्वत्रिक माहिती आदान- प्रदान करण्यास मदत होईल. कोविड-19 ची महामारी लक्षात घेता, आमच्या बजेटमध्ये टेली मेंटल हेल्थ प्रोग्रामवर लक्ष केंद्रित केले आहे की, जे योग्य दिशेने एक पाऊल आहे आणि त्याचा मोठ्या प्रमाणात रुग्णांना फायदा होईल.
बजेट अतिशय संतुलित आहे. यामुळे रोजगार निर्माण करणाऱ्या, उत्पादनाला चालना देणारी, कृषी-अर्थव्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीला मदत करणाऱ्या विकासाभिमुख धोरणांसाठी खर्चाला चालना मिळते.
नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टमसाठी खुले व्यासपीठ तयार करण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे.
परंपरा आणि अर्थसंकल्पीय भाषणापासून दूर जात, 62 वर्षीय सीतारामन यांनी महिला सबलीकरणाला एक सूक्ष्म धक्का दिला, त्यांनी तो न म्हणता ती असा करदात्याची उल्लेख केला त्याकडे लक्ष वेधले जाईल. याची खात्री करून, डिजिटल शिक्षण, मानसिक आरोग्य आणि कर सवलती यातून नक्कीच बदल घडेल.
…….

डॉ. सोनाली सरनोबत,
….
( जिल्हा उपाध्यक्षा /
महिला मोर्चा बेळगाव )
…..
( माजी सहसंयोजक / मेडिकल सेल बीजेपी )
……

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!