अंध मुलांवरती डॉक्युमेंट्री फिल्म बनवून त्यांचा जीवन प्रवास कसा असतो हे सर्वांना दाखवून देण्याचे कार्य वाय नॉट क्रिएशन या ग्रुप ने केले आहे .
या धगधगीच्या आयुष्यात आपल्या कुटुंबाला वेळ देणे देखील मुश्किल बनले आहे मात्र बेळगावातील अशा एका ग्रुपने वेळात वेळ काढून अंध मुलांवरती एक लघुपट बनविला आहे .
वाय नॉट क्रीयेशन या चित्रपट निर्मात्या ग्रुपने माहेश्वरी अंध शाळेच्या मुलांवर ती एक सुंदर डॉक्युमेंटरी फिल्म बनवली आहे.
त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून अंध मुलांचे जीवन कशा प्रकारे चालते तसेच त्यांना कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते हे या डॉक्युमेंटरी च्या माध्यमातून दाखवून दिला आहे.दृष्टी असे या डॉक्युमेंट्री चे नाव असून वाय नॉट क्रीयेशन चे संस्थापक प्रणाम राणे आणि अक्षय गोडसे यांनी ही सुंदर आणि सगळ्यांना प्रबोधन करणारी डॉक्युमेंट्री रिलीज केली आहे.
तसेच सध्या या डॉक्युमेंटरी चा टीजर ही रिलीज करण्यात आला असून नागरिकांमधून या करण्यात आलेल्या डॉक्युमेंट्री चे कौतुक करण्यात येत आहे.
दृष्टी या डॉक्युमेंटरी मध्ये संगीत या सहा डबींग अजिंक्य कुडतरकर यांनी केले असून वाईस वर आर्टिस्ट म्हणून अनेकांनी काम केले आहे याशिवाय कित्येक जणांनी या दृष्टी डॉक्युमेंटरी साठी आपला सहभाग आणि योगदान दिले आहे.
अंध मुलांचा जीवनप्रवास सक्षम करण्याचा प्रयत्न या डॉक्यूमेंट द्वारे करण्यात आला असून
ही डॉक्युमेंट्री यु ट्यूब वरती लवकरच प्रसारीत करण्यात येणार असल्याची माहितीदेखील देण्यात आली आहे.