गणाचारी गल्ली येथील बकरीमंडी येथे नूतन खंडोबा मंदिर बांधण्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला.
शहरामध्ये खाटीक समाजाचे वास्तव अनेक वर्षांपासूनचे आहे. खाटीक समाजाचे कुलदैवत खंडोबा असल्यामुळे तसेच खाटीक समाजाची अनेक वर्षापासूनची मंदिर बांधण्याची इच्छा असल्याने गणचारी गल्लीत मंदिर च्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी आमदार अनिल बेनके आणि सर्व खाटीक समाजाच्या प्रमुखांसोबत या बांधकामाला भूमिपूजनाने चालना देण्यात आली तसेच लवकरात लवकर हे मंदिरचे बांधकाम पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन याप्रसंगी देण्यात आले.
यावेळी अध्यक्ष उदय गोडके, दिपक गायकवाड, दामोदर भोरडे, प्रकाश महागावकर, सुधीर गोडके, अशोक कांबळे, धनंजय गोडके, दीपक शेटके, चंद्रकांत बेळगावकर, सुनील बेळगावकर, सिद्धू काळगे, सतीश गोडके तसेच संचालक मंडळ व समाज बांधव उपस्थित होते.