ग्रामीण भागातील वीज पुरवठा सातत्याने खंडित करण्यात येत आहे त्यामुळे हेस्कॉम तर्फे उद्या शनिवार दिनांक 18 रोजी सकाळी 11 वाजता विधुत अदालत आयोजित करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील विजेच्या समस्येवर तातडीने उपाय करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतले आहे त्यानुसार उद्या हेस्कॉम तर्फे विद्युत आदालत पार पडणार आहे
तालुक्यातील किणये आंबेवाडी निलजी केदनूर येळ्ळूर सुळेभावी येथे विद्युत अदालत होणार आहे त्यामुळे गावकऱ्यांनी विद्युत संबंधित समस्या असेल तर त्यांनी या अदालतीमध्ये मांडाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे .
याबरोबरच जिल्ह्यातील खानापूर बैलहोंगल सौंदत्ती गोकाक मुडलगी तालुक्यातही विद्युत अदालत आयोजित करण्यात येणार असून तेथील ही समस्या लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचे आश्वासन हेस्कॉम तर्फे देण्यात आले आहेत