जन्मदात्या पित्यानेच आपल्या मुलगी आणि मुलासह सासू वर चाकू हल्ला केल्याने ते या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. दिपक वाके असे हल्ला केलेल्या आरोपीचे नाव असून ते हनुमान नगर येथील रहिवासी आहेत.
या घटनेत दिया वाके आणि दिनेश वाके यांच्यासह त्यांच्या आजी देखील जखमी झाल्या आहेत तसेच पत्नी कामाला गेली असल्याने ती बालबाल बचावली आहे.
दीपक वाके यांचा कंग्राळी बुद्रुक येथील कल्पना हुरुडे वाके हिच्यासोबत विवाह झाला होता. माझ्या लग्नाचा वेळी दीपक वाके यांनी फसगत केल्याने त्यांनी आपल्या मुलांना वाढविण्याकरिता कापडाच्या दुकानात नोकरी स्वीकारली. त्यावेळी त्यांना दोन अपत्ये झाली. मात्र पती-पत्नीच्या भांडण सतत होत असल्याने दीपा या गेल्या महिन्यात आपल्या माहेरी आल्या .
यावेळी गुरुवारी रात्री त्या कामाला गेले असता त्यांच्या पतीने त्याच्या माहेरी येऊन आतून घराची कडी लावली तसेच सासू आणि मुलगा मुलगी वर चाकू हल्ला केला. प्रारंभी त्यांनी घराची कडी लावून धमकी देत गॅस सिलेंडर चालू करून ते जास्त करण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांनी घरात शिरून हा त्याचा कट उधळला.
या झालेल्या चाकू हल्ल्यात मुलगा-मुलगी सासू जखमी झाले असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.तसेच या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.