27 जून च्या महामोर्चात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा— खानापूर समितीकडून जोरदार जनजागृती
मराठी भाषिकांना परिपत्रके मराठी मधून मिळावीत यासाठी 27 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या महामोर्चा ची जनजागृती करण्यासाठी खानापूर तालुक्यातील तिवोली या गावी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने पत्रके वाटण्यात आली यावेळी गावचे ज्येष्ठ नागरिक व सीमा सत्याग्रही गोपाळ हेब्बाळकर गुरुजी यांनी सीमावासीय वर होणाऱ्या अत्याचाराचा पाढा वाचून या मोर्चामध्ये तीओली गावातील नागरिक असंख्य संख्येने सामील होतील व मोर्चा यशस्वी करतील असे आश्वासन दिले .
तसेच उपस्थित असलेल्या तरुणांना मोर्चाविषयी गांभीर्य समजावून सांगून मराठी भाषेसाठी युवकाने मोठ्या संख्येने या लढ्यात झोकून देणे गरजेचे आहे यामुळे या लढ्याला उभारी मिळेल असे व्यक्तव्य श्री निरंजन सरदेसाई त्यांनी केले तसेच तीओली गावचे रहिवासी व महाराष्ट्र एकीकरण समिती चे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी समितीच्या लढ्यामध्ये आपल्या गावच्या नागरिकांनी दिलेल्या योगदानामुळे मला हे अध्यक्षपद प्राप्त झाले या अध्यक्षपदाचा मान वाढविण्याचे कार्य व गावचे नाव माझ्या हाताने व्हावे यासाठी गावातील नागरिकांनी आजपर्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मला दिला तशाच पद्धतीचा प्रतिसाद या महामोर्चा वेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती दर्शवून हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी द्यावा असे सांगितले .
यावेळी सहदेव हे बाळकर विठ्ठल पाटील संभाजी संभाजी लाडगावकर पुंडलिक लाडगावकर सहदेव पाटील जॅकी फर्नांडिस मार्टिन सूज पुंडलिक सुतार अशोक पाटील नारायण गाडी देवाप्पा गाडी पांडूलाडगावकर तसेच मोठ्या संख्येने युवक व ज्येष्ठ नेते पी एस पाटील सूर्याजी पाटील राजाराम देसाई युवा समितीचे कार्याध्यक्ष किरण पाटील राजू पाटील खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.