बेळगाव टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनची मासिक बैठक काल हॉटेल सॅंटोरिनी येथे आयोजित करण्यात आली होती .प्रख्यात योगी श्री नईम शेख यांनी सदस्यांना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कसे तंदुरुस्त राहायचे याचे मार्गदर्शन केले. त्यानंतर आगामी जीएसटी डे आणि टॅक्स प्रॅक्टिशनर्स डे साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी नुकतेच S S L C आणि P U C 2 वर्ष उत्तीर्ण झालेल्या असोसिएशनच्या सदस्यांचा मुलांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सदस्य पांडुरंग व्हावळ आणि श्रीधर पाटील यांच्या हस्ते मुलांना रोख बक्षिसे देण्यात आली.
यावेळी जितेश कब्बूर, सी, महांतेश दादीगुंडी, उपाध्यक्ष, भारतेश मुरगुंडे सचिव आणि विक्रम कोकणे सदस्य अनिल कुंडप, प्रवीण मुंगारवाडी, श्रीनिवास कुरुंदवाड, संजीव बडगंडी उपस्थित होते.