गौंडवाड मध्ये देवस्थानच्या जमिनीच्या वादातून मृत्यू झालेल्या लढवय्या सतीश पाटील याला त्याच्या वर्गमित्रांनी एका अनोख्या प्रकारे श्रद्धांजली वाहिली आहे.
सतीश च्या सर्व बाल मित्रांनी मिळून नुकत्याच बारावी मध्ये पास झालेल्या होतकरू विद्यार्थ्यांनीच्या पुढील शिक्षणाकरिता मदत देऊ केली आहे.
त्यांनी 81% मार्क्स घेऊन पास झालेल्या होतकरू विद्यार्थिनी साठी तिच्या पुढील शिक्षणाकरिता बॅचलर ऑफ सायन्स चा ऍडमिशन करिता तीस हजार रुपयांची मदत दिली आहे.
आपल्या वर्ग मित्राला श्रद्धांजली वाहण्यात करिता मराठी विद्यानिकेतन मध्ये 1992 पासून 2002 पर्यंत शिक्षण घेतलेल्या सर्वांनी सतीश च्या नावाने ही मदत देऊ केली आहे . त्यामुळे या विद्यार्थिनीच्या पुढील शिक्षणाकरिता तिला मदत होणार आहे