SKE सोसायटीच्या RPD कॉलेज बेळगाव येथे आयोजित गोवा मुक्ती चळवळीतील स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्यात आला . यावेळी येथील SKE सोसायटीच्या RPD कॉलेज बेळगाव येथे गोवा मुक्ती चळवळ दिन साजरा करण्यात आला,
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याचे उर्जामंत्री आणि गृहनिर्माण मंत्री सुदिन ढवळीकर-उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात गोवा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करून झाली.
यावेळी स्वातंत्र्यसैनिक अॅड. श्री. राम आपटे, श्री. परशुरामभाऊ नंदीहळ्ळी , श्री. विठ्ठल याळगी, श्री. राजेंद्र कलघटगी आणि श्री. सोमनाथ रेडेकर यांचा मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी अध्यक्ष श्री किरण ठाकूर, विद्यार्थी, शिक्षक व SKE सोसायटीचे संचालक उपस्थित होते.