पुलावर गुडघाभर साचलेल्या पाण्याला वाट करून गटार स्वच्छ करण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते वीरेश हिरेमठ यांनी शुक्रवारी रात्री केले. त्यामुळे वाहनधारकांना पुलावरून जाणे सोयीस्कर ठरले.
येथील राजहंस गड रस्त्यावरील पुलावर पावसामुळे गुडघाभर पाणी तुंबून राहिले होते त्यामुळे येथून वाहने हाकताना वाहनधारकांना अनेक त्रास उद्भवत होता.
यावेळी येथून जाताना सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व लोक फाउंडेशनचे अध्यक्ष वीरेश हिरेमठ यांनी ही परिस्थिती पाहताच येथील साचलेल्या पाण्याला वाट मोकळी करून दिली . तसेच गटारीत साचलेला कचरा बाहेर काढून गटारी ची स्वच्छता देखील केली.
येथील पुलावर पाणी साचल्याने याठिकाणी अपघात होणार याची शक्यता लक्षात घेऊन वीरेश हिरेमठ यांनी साचलेल्या पाण्याला वाट करून दिली. जवळ पास या ठिकाणी तासभर त्यांनी श्रम मोहीम राबवून वाहनधारकांना वाट मोकळी करून दिली.