ऑपरेशन मदत व इनरव्हील क्लब बेळगाव यांच्या तर्फे कणकुंबी हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना रेनकोटचे वितरण करण्यात आले. सध्या पावसाळ्याला सुरुवात होत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून तसेच त्यांचा पावसापासून बचाव करण्याकरिता त्यांना रेनकोट चे वितरण करण्यात आले.
बेळगाव जिल्ह्यातील व पश्चिम घाटातील अतिपर्जन्यमान असलेल्या कणकुंबी गावाजवळील अतिदुर्गम खेड्यात जंगलातून पायवाटेने ये जा करीत अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.त्यामुळे त्यांचा या पावसातुन बचाव होण्याकरिता ऑपरेशन मदत व इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रेनकोट वितरणाचा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी रेनकोट वितरणाचा कार्यक्रम येथील श्री माऊली विद्यालय कणकुंबी येथे राबविण्यात आला .यावेळी सर्व विद्यार्थ्यांना रेनकोट चे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी इनरव्हील क्लबचे अध्यक्ष सुषमा शेट्टी डॉक्टर सविता कद्दू ममता जैन श्रुतिका बागी , सुनीता हनमशेठ, अंजू अगरवाल ,भारती उपाध्ये यांचे शाळा सुधारणा कमिटीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
त्यानंतर अध्यक्ष सुषमा शेट्टी यांचा शाळेतील मंत्री मंडळातर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर रेनकोट वितरणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.