ब्रदर डेच्या निमित्त लॉज व्हिक्टोरिया आणि एक्स्पर्ट व्हॉल्व्ह अँड इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांनी केएलई प्रभाकर कोरे हॉस्पिटल रक्तपेढीच्या सहकार्याने एक्स्पर्ट व्हॉल्व्ह परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
यावेळी लॉज व्हिक्टोरियाचे सदस्यासह अन्य व्यक्तींनीही स्वेच्छेने रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात एकूण 75 रक्त युनिट संकलित करण्यात आले.
याप्रसंगी अॅलन विजय मोरे यांनी प्रथमच रक्तदान केले आणि त्यानंतर दर सहा महिन्यांनी आणि आपत्कालीन काळात रक्तदान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर विजय मोरे यांनी सर्वांना रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी विनायक लोकूर ,अभिमान भालेराव, अंबाप्रसाद नेर्लीकर, सिद्धार्थ चंदगडकर, समीर कुत्रे आणि मेसोनिक हॉल लेडीज विंगच्या अध्यक्षा सौ नम्रता कुट्रे , आशा नाईक, रूपा लोकूर उपस्थित होते .