अनिल बेनके फाउंडेशन,केएलई विश्वविद्यालय, डॉक्टर प्रभाकर कोरे रुग्णालय व वैद्यकीय संशोधन केंद्र तसेच जे एन मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज शहरात मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले.यावेळी नागरिकांनी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला .
सदर मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन रुक्मिणी नगर येथील सरकारी शाळेच्या आवारात पार पडले.यावेळी या शिबिराचे उद्घाटन उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून या मोफत आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिरास सुरुवात करण्यात आली.
यावेळी डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया रक्तदाब मधुमेह नाक-कान-घसा यासह अनेक तपासण्या करण्यात आल्या. याप्रसंगी उत्तर मतदार क्षेत्रात 14 ठिकाणी प्रत्येक रविवारी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी आमदार अनिल बेनके यांनी दिली.
त्यानंतर ते पुढे म्हणाले की पुढील आठवड्यात चव्हाट गल्ली त्यानंतर पुढील आठवड्यातील प्रत्येक भागात वेगवेगळ्या रविवारी नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आहे. त्यामुळे नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी केले.