येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवार दिनांक 27 जून रोजी होणाऱ्या विराट मोर्चा सहभागी होण्याकरिता गावकऱ्यांना आवाहन करण्यात आले.
यावेळी येळ्ळूर गावात मोर्चा बैठक घेऊन होणाऱ्या विराट मोर्चा संदर्भात जनजागृती करण्यात आली. तसेच येथील नागरिकांना मोठ्या संख्येने न विराट मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
यावेळी बैठकीस महाराष्ट्र एकीकरण समितीचे विभाग अध्यक्ष शांताराम कुगजी सेक्रेटरी प्रकाश अष्टेकर यांच्यासह इतर सदस्य कार्यकर्ते आणि गावातील नागरीक उपस्थित होते.