फेसबुक फ्रेंड सर्कल च्या वतीने दर महिन्याला दोन कुटुंबीयांना मदत देण्यात येते ही मदत ते दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने करत असतात. या महिन्यात त्यांच्या मदतीला रणजीत शेट्टी धावून आले आहेत.
रणजीत शेट्टी यांनी हलाप्पा उचगावकर यांच्या डायलिसीस करिता मदत दिली आहे. तसेच उचगाव येथील दावतार कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालविण्याकरिता मदत देऊ केली आहे.
या दोन्ही कुटुंबाची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने रणजीत शेट्टी यांनी मदत देऊ केली असल्याने फेसबुक फ्रेंड सर्कल ने तसेच या दोन्ही कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले आहेत.