बेळगावात राहणार्या मराठी माणसावर सर्वप्रकारे अन्याय झाला आहे. बेळगावात निम्म्याहून अधिक मराठी भाषिक आहेत.मात्र त्यांना सरकारी कागदपत्रे मिळविण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे. तसेच सर्व सरकारी कार्यालयांत मध्ये कन्नड बोलण्याकरीता सक्ती करण्यात येत आहे. त्यामुळे मराठीतून सरकारी कागदपत्रके मिळावीत आणि मराठी अल्पसंख्यांकांना त्यांचे अधिकार मिळावे याकरिता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आणि मराठी माणसाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी चन्नम्मा चौक येथून या मोर्चाला प्रारंभ झाला.
त्यानंतर मोर्चात सहभागी झालेल्या सर्वांनी मराठीतून सरकारी कागदपत्रके मिळावेत याकरिता जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी मिळाली पाहिजेत, मिळाली पाहिजेत सरकारी कागदपत्रे मराठीतून मिळाली पाहिजेत, जय भवानी जय शिवाजी,कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहात नाही यासह अनेक घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
कर्नाटकातील अल्पसंख्यांक मराठी भाषिकांना त्यांच्या मातृभाषेतून कागदपत्रे देण्याकरिता टाळाटाळ करण्यात येत आहे. बेळगावातील काही मराठी भाषिकांना कन्नड भाषा अवगत नसल्याने कागद पत्रकात कोणते नियम कायदे अटी आहेत याबाबत समजेनासे झाले असल्याने त्यांना मराठीतून कागदपत्रे द्यावी या मागणीकरिता आज विराट मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर केले.
याआधी काही दिवसांपूर्वी या विराट मोर्चा करिता सर्व खेडोपाडी गावे शहर याबरोबरच आणि भागात विराट मोर्चा संदर्भात परिपत्रके वाटून जनजागृती करण्यात आली होती.
त्यानुसार आज सर्व गावातील मराठी भाषिक एकत्रित येऊन ते सीमावासीय लाख सीमावासीय असल्याचा प्रत्यय यावेळी मोर्चा प्रसंगी दिला.
बेळगावात मराठी भाषिकांची संख्या जास्त आहे.त्यामुळे त्यांना मराठीतून कागदपत्रके मिळावित तसेच कर्नाटक सरकारला धडकी भरण्याकरिता या विराट मोर्चा काढला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी मराठी भाषिकांना अल्पसंख्यांकांचे अधिकार मिळावेत, सरकारी कागदपत्रके मराठी भाषेत लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी आणि मराठी भाषिकांची बेळगावात करण्यात येणारी गळचेपी लवकरात लवकर थांबवावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.