आरोग्य हीच संपत्ती मानत अयोध्या नगर येथील डॉक्टर रवी पाटील यांचा विजय अर्थ अँड ट्रॉमा सेंटर मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन आज सकाळी डॉक्टर रवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. हे शिबीर सलग आठवडाभर चालणार असून या शिबिरात रक्तदाब मधुमेह वजन-उंची ईसीजी क्ष-किरण सांधे दुखी गुडघे दुखी मान दुखी यावर उपचार करण्यात येणार आहेत.
आज दिनांक 27 जून ते तीन जुलै पर्यंत सकाळी आठ ते दुपारी दोन या वेळेत सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर रवी पाटील यांच्या तर्फे करण्यात आली आहे.
यावेळी उद्घाटनाप्रसंगी एस विजयनरसिंह, आर आर मुतनाळी, बीएस दासर डॉक्टर रवी पाटील मंजुनाथ अंगडी, जनसंपर्क अधिकारी वीरेश हिरेमठ उपस्थित होते.