हिंडलगा येथून प्रतिवर्षा श्री क्षेत्र पंढरपूर
येथे आषाढी वारीला पायी दिंडी जाते.
यावेळी दि. 28 रोजी दिंडीचे प्रस्थान झाले.
महादेव गल्ली येथील ह. भ. प. आप्पाजी
चौगुले यांच्या घरापासून सुरू झाली. ही
दिंडी गावातील मारुती मंदीर, लक्ष्मी, राम
विठ्ठल मंदीर व कलमेश्वर मंदीर दर्शन घेत
गावातील प्रमुख मार्गावरून फेरी काढली.
गावकऱ्यांनी ठिकठिकाणी महिलानी
आरती ओवाळून शुभेच्छा दिल्या.
गावकऱ्यांनी देखील देणग्या देवून
शुभेच्छा दिल्या. विठ्ठल मंदीर याठिकाणी
महालक्ष्मी देवी यात्रोत्सव संघाचे अध्यक्ष
कृष्णा पावशे, खजिनदार उदय नाईक,
सेक्रेटरी प्रकाश बेळगुंदकर, मोहन नाईक,
ग्रामपंचायत सदस्य यल्लाप्पा काकतकर,
राजू कुपेकर, विलास नाईक यांनी शुभेच्छा
दिल्या. यावेळी कृषी पत्तीन संघाचे चेअरमन रमाकांत पावशे, श्रीकांत जाधव
यानी दिंडीत भाग घेतल्याबद्दल सत्कार
करण्यात आला.
या दिंडीत नारायण काकतकर, बाळू नाईक, युवराज अगसगेकर, सुनील बेळगुंदकर, वसंत
काकतकर, चंदू काकतकर याशिवाय
महिला यांचा समावेश आहे. गावातील
नव्वद भाविक सहभागी झाले आहेत.
ठिकठिकाणी सदर पायी दिंडीचा मुक्काम
होणार असून त्यानंतर पंढरपूर येथे पोहचणार आहे.