क्लब रोडवरील ह्युम पार्क येथे बागायत खात्यातर्फे रोप बाजार आणि वनीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन आज आमदार अनिल बेनके आणि जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
त्यानंतर या रोप बाजार मधील रोप वाटून आयोजित केलेल्या बागायत खात्याच्या कार्यक्रमाला चालना देण्यात आली. बागायत खात्यातर्फे दर वर्षी प्रमाणे पावसाळ्याच्या सुरुवातीला फळे फुलांच्या रोपांचे प्रदर्शन आणि विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात येते त्याचप्रमाणे यंदाही पावसाळ्यापूर्वीच या प्रदर्शनाला चालना देण्यात आली.
या रोपबाजार प्रदर्शनात विविध फळफुळ यासह रोप विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्याशिवाय फळझाडे रोप झाडे चांगल्या गुणवत्तेचे खत अत्यंत माफक दरात विक्री करीता ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रदर्शनाचा लाभ बेळगाव येथील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.