वाढत्या डेंग्यू रोगाची संख्या लक्षात घेता गर्लगुंजी गावातील मारुती मंदिर ,विठोबा मंदिर ,शिवाजी नगर ,पाटील गल्ली ,कुलकर्णी गल्ली लक्ष्मी मंदिर आणि इतर ठिकाणी डेंग्यू चिकनगुनिया लसीकरण करण्यात आले.
यावेळी गावातील जवळपास 3800 नागरिकांनी याचा लाभ घेतला.येथील ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाटील हे सलग 8 वर्षे स्वखर्चाने ही मोहीम राबवित आहेत.
त्यांनी गर्लगुंजी पाठोपाठ निडगल ,इदलहोंड ,कटगली , गणेबैल ,प्रभूंनगर ,बरगाव ,कुटगिरी ,भांडरगाळी ,टोपिंनकट्टी ,बिदरभावी याठिकाणी लसीकरण करणार असल्याचे प्रसाद पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी लसीकरण करताना परशराम कुंभार ,संदीप चौगुले विशाल कोलकार, कल्लापा लोहार ,सोमनाथ पाटील, संतोष गोरे ,सोमनाथ मेलगे ,सुजित कुंभार ,अजय कोलकार, रोहित नावलगी, मारुती मुचंडी,महेश चौगुले,यलापा रजपूत यांनी विविध भागात लसीकरण केले.