No menu items!
Friday, August 29, 2025

राजस्थान मधील हिंदूंना संरक्षण द्या – हिंदू जनजागृती समिती

Must read

भारतात हिंदूंची निर्घृण हत्या करण्यात येत आहे. राजस्थान मधील उदयपूर येथे झालेल्या कन्हैया लाल यांच्या हत्येचे प्रकरणाच्या आधी सुद्धा हिंदूं व्यक्तीवर या ना त्या कारणावरून सूड उगवत मुस्लिम धर्मियांनी अनेकांच्या हत्या केली आहे. त्यामुळे याच्या निषेधार्थ हिंदू जनजागृतीच्या समितीच्या वतीने त्या अपराधांना कडक शिक्षा व्हावी आणि हिंदूंना संरक्षण मिळावे याकरिता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र गृह सचिवांना निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी या निवेदनात हिंदू जनजागृती समितीने अनेक मुद्दे मांडले आहेत. यामध्ये त्यांनी 3 एप्रिल या दिवशी राजस्थानचा करोली येथे नववर्षाच्या मिरवणुकीवर धर्माधनी आक्रमण केले. 50 हिंदूंची वाहने दुकाने यांना आग लावली.50 पेक्षा अधिक लोक जखमी केले.या घटनेनंतर हिंदू जिवाच्या भीतीने तेथून पलायन केल्याचे नमूद केले आहे. तसेच 22 मे रोजी राजस्थानच्या जोधपूर येथे दलित हिंदू कुटुंबावर रोहिंग जो मुस्लिम धर्मीयांनी हल्ला केल्याचे नमूद केले आहे.तसेच 12 मे रोजी राजस्थानच्या येथे विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख श्री सतवीर सरहरण यांच्यावरही आक्रमण केले आहे तसेच विविध ठिकाणी अनेक हिंदू नेत्यांची निर्घृण हत्या केल्याचे सांगितले आहे.

त्यामुळे राजस्थान येथील ही सर्व प्रकरणे केंद्रशासनाने गांभीर्याने लक्षात घेऊन राजस्थानमधील हिंदूंच्या रक्षणासाठी धाव घ्यावी आणि तेथील कायदा सुव्यवस्था राखण्यास आबादीत राखावी आणि विफल ठरलेल्या राजस्थान शासनाला बरखास्त करावे. तसेच कडक शासन निर्माण करावे तसेच हिंदूंना संरक्षण द्यावे अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने निवेदनाद्वारे केली आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!