केंद्र सरकारने आजपासून नवीन कामगार कायदा लागू करणार आहे. यामध्ये कामाचे तास पगार पीएफ यामध्ये मोठे बदल केले जाणार आहेत.
त्यामुळे आठवड्यातील चार दिवस प्रत्येकी 12 तास काम केल्यास कामगारांना तीन दिवसांचा वीकऑफ मिळणार आहे. तसेच भविष्य निर्वाह निधीतील हिस्सा वाढणार आहे. यामुळे हातात येणारा पगार कमी होण्याची शक्यता आहे. तसेच कंपन्यांना पगाराचा दिवस निश्चित करावे लागणार आहेत.
यासोबतच आधी रजेसाठी पात्र होण्यासाठी किमान 240 दिवस काम करणे अपेक्षित आहे. तसेच 180 दिवसात रजेसाठी कामगार पात्र होणार आहेत. कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडल्यानंतर किंवा बडतर्फ केल्यानंतर दोन दिवसात वेतनासंबंधी सर्व प्रक्रिया कंपनीला पूर्ण करायच्या आहेत.
मोदी सरकार नवीन कामगार कायदा घेऊन येत आहे.केंद्र सरकार आज पासून नवीन कामगार कायदा लागू करण्याची शक्यता आहे.यामुळे सर्व उद्योग आणि क्षेत्रांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.