गर्लगुंजी येथील विश्व भारत सेवा समिती संचलित ज्योतिराव फुले विद्यालयाला रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रल च्या वतीने ग्रीन बोर्ड चे वितरण करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे शिक्षण घेता यावे तसेच त्यांना फळ्यावर लिहिलेली अक्षरे चांगल्या प्रकारे दिसावीत याकरिता या ग्रीन बोर्ड देण्यात आल्याची माहिती यावेळी रोटरी क्लब च्या वतीने देण्यात आली.
यावेळी रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलच्या सदस्यांनी मुख्याध्यापक के एम पाटील यांच्याकडे ग्रीन बोर्ड सुपूर्द केला.
त्यानंतर दीपप्रज्वलन फोटो पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष रवी हत्तरकी यांनी रोटरी क्लबच्या कार्याचा उद्देश सांगितला आणि विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे उत्तम प्रकारे शिक्षण घेऊन आपल्या जीवनात यशस्वी व्हावे याबद्दल मार्गदर्शन केले.
त्यानंतर मुख्याध्यापक के एम पाटील यांनी रोटरी क्लबऑफ बेळगाव सेंट्रल ने ग्रीन बोर्ड दिल्याबद्दल विद्यालयाचे आभार मानले याप्रसंगी रोटरी क्लबचे ऑफ बेळगाव सेंट्रलचे सदस्य आणि शाळेचे शिक्षक कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.