छायाचित्रकार संतोष पाटील यांना बेळगाव जिल्हा बेस्ट फोटोग्राफर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. कर्नाटक छायाचित्रकार संघ बेंगलोर यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला असून बेंगलोर येथे झालेल्या डीजे इमेज 2022 या कार्यक्रमात त्यांना बेस्ट फोटोग्राफर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
संतोष पाटील यांना सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे बेळगाव फोटोग्राफर असोसिएशन आणि शहरवासी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे. संतोष हे शहरात एक उत्तम आणि उत्कृष्ट छायाचित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत.