येथील चंदगड तालुका बेळगाव रहिवासी संघटना व चंदगड मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीतर्फे सभासदांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वितरण व दहावी-बारावीतील गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे. शैक्षणिक साहित्यासाठी पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी आपली नावे सोसायटीच्या रामदेव गल्लीतील कार्यालयात नोंदवावीत. तर दहावी आणि बारावीत ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेचे झेरॉक्स कार्यालयात आणून द्यावे. अधिक माहितीसाठी सोसायटीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष एम. के. पाटील यांनी केले आहे
चंदगड सोसायटीतर्फे विद्यार्थ्यांना आवाहन
By Akshata Naik
Previous articleनिधन वार्ता
Next articleवृक्षारोपण केल्यावर त्यांचे संगोपन करणे गरजेचे