साई ज्योती फाउंडेशनच्या वतीने आज व्हॅक्सीन डेपो परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी याठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. याप्रसंगी नगरसेवक आनंद चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
प्रारंभी फाउंडेशनच्या संचालिका ज्योती बाके यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर व्हॅक्सीन डेपो परिसरात विविध प्रकारची रोपे लावण्यात आली.
यावेळी बोलताना साई ज्योती फाउंडेशनच्या संचालिका ज्योती निलजकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले .त्या म्हणाल्या दरवर्षी विविध संघटनांकडून वृक्षारोपण करण्यासाठी पुढाकार घेतला जातो. मात्र वृक्षारोपण करीत असताना लावण्यात आलेले वृक्ष चांगल्या प्रकारे वाढतील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले.
त्यानंतर उपस्थितांनी वृक्षांच्या संवर्धनासाठी काम करण्याचा निर्णय घेतला .याप्रसंगी सुमंगला पूजार, राधिका सिंदगी, श्रुती यल्लुरकर, सुनीता खणायत, मंथन चौगुले, अनुप माळी आदि उपस्थित होते.