दुचाकीची दुभाजकाला धडक बसल्याने झालेल्या अपघातात हलगा येथील 22 वर्षीय तरुण ठार झाल्याची घटना काल सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली आहे.
या अपघातात सुदर्शन विजय पाटील वय 22 राहणार महावीर नगर हलगा याचा मृत्यू झाला आहे. सुदर्शन चे दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने त्याची दुचाकी दुभाजकाला धडकली यावेळी त्याच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
सदर घटनेची नोंद दक्षिण बेळगाव रहदारी पोलीस स्थानकात करण्यात आली असून या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.