भाजप मोर्चा खानापूरचे दत्ताराम पाटील यांनी स्वखर्चाने शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वितरण केले आहे . डॉक्टर सोनाली सरनोबत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी मुलांना चांगले शिक्षण मिळावे याकरिता शिक्षणाचे साहित्य देऊ केले आहे.
त्यांनी येथील भुरुनकी कन्नड प्राथमिक शाळेतील मुलांना शिक्षणाचे महत्त्व जाणून शैक्षणिक साहित्याचे वितरण केल्याबद्दल शाळेच्या वतीने तसेच विद्यार्थ्यांनी दत्ताराम पाटील यांचे आभार मानले आहे.